![]() |
माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील |
तालुक्याचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भरमू अण्णा पाटील हे रविवारी 28 जुलै 2019 रोजी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
चंदगड तालुक्यात माजी मंत्री पाटील यांचा स्वतंत्र मोठा गट अस्तित्वात आहे तो आजही टिकून आहे. स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा गट म्हणून भरमूआण्णा पाटील गटाची आजपर्यंतची ओळख आहे. तालुक्यात अडीचशे दुध संस्था, 50 हून अधिक ग्रामपंचायती, बहुतांश सेवा संस्थावर भरमू पाटील गटाचे वर्चस्व आहे. पंचायत समितीवर सध्या भरमू पाटील गटाचे सभापती, उपसभापती कार्यरत आहे. बाजार समिती मध्येही या गटाची सत्ता आहे. भरमू पाटील यांनी भाजपात प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची प्रभावी इच्छा होते. पण काही कार्यकर्त्यांनी अजून थोडा वेळ थांबून नंतरच माझे प्रवेश करावा अशी इच्छा व्यक्त केली. अखेर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भाजप प्रवेश करावा असे सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रविवार दिनांक 28 जुलै 2019 रोजी कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाअध्यक्ष हिंदुराव शेळके, बाबा देसाई, महेश जाधव, प्रदेश कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, तालुकाध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. माझे मंत्री भरमू पाटील हे त्यांच्यासोबत दूध संस्था, पतसंस्था, सेवासंस्थाचे अध्यक्ष व पदाधिकारी, आजी, माजी जि. प. व पं. स. सदस्य, विद्यमान सभापती, उपसभापती, माजी सभापती यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत. यासाठी तालुक्यातून दीडशेहून अधिक गाड्या भरुन कार्यकर्ते कोल्हापूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment