![]() |
चंदगड-झांबरे मार्गावर केबलसाठी केलेली चर खुदाई धोकादायक अवस्थेत आहे. |
चंदगड-जांबरे रोडवर चंदगड पासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या बाजुला केबलसाठी खुदाई केलेली चर न मुजविल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चर सुमारे साडेचार फूट खोल असल्याने यामध्ये पडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने ही चर त्वरीत मुजवून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
चंदगड-जांबरे मार्गावर आडुरे, कोकरे, किरमटेवाडी, उमगाव, न्हावेली व जांबरे या गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्ग नसल्याने याच मार्गावरुन मार्गक्रमण करावे लागते. पाच – ते सहा वर्षापूर्वी हा रस्ता नव्याने केला आहे. मात्र एका कंपनीने या रस्त्याच्या कडेला खुदाई करुन केबल टाकण्यासाठी चर काढली आहे. मात्र या ठिकाणी उतार असल्यामुळे या चरीवर टाकलेली माती वाहून गेल्याने चर पुन्हा खुली झाली आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या अंदाज न आल्यास यामध्ये पडून जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने कंपनीशी संपर्क करुन हि चर मुजवावी व प्रवाशांचा सुरक्षित प्रवास करता यावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
No comments:
Post a Comment