हलकर्णी महाविद्यालयात कारगील विजय दिवसानिमित्त युद्धातील शहीद जवानांना अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2019

हलकर्णी महाविद्यालयात कारगील विजय दिवसानिमित्त युद्धातील शहीद जवानांना अभिवादन

हलकर्णी महाविद्यालयात कारगील युद्धातील शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
२६ जुलै म्हणजे भारतीयांच्या अंतःकरणावर कोरलेला दिवस आहे. हा दिवस सर्वत्र कारगिल विजय म्हणुन भारतीयांनाअभिमानाचा वाटतो. भारतीय सैन्याने कारगीलमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्यांशी लढुन हे युद्ध जिकंले. विजयी दिवस म्हणुन नेहमीच भारतीय जवानांचा अभिमानाचा दिवस आहे." असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.वाय. निंबाळकर यांनी केले. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कारगील युद्धातील शहीद जवानांना अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. राजेश घोरपडे, डॉ. चद्रकांत पोतदार, आणि महाविद्यालयातील सदस्य प्रा.शाहु गावडे, प्रा.एम.बी. मापटे, डॉ.जे.जे. व्हटकर तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी, विद्यार्थांणी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment