कालकुंद्री येथे 'वाघचावडा ' यात्रा उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2019

कालकुंद्री येथे 'वाघचावडा ' यात्रा उत्साहात संपन्न

वाघाचावडा यात्रेनिमित्त बनवली गेलेली वाघाची लाकडी प्रतिकृती.
कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री ता. चंदगड येथे वाघ चावडा ची यात्रा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात दरवर्षी संपन्न होणारी ही एक वैशिष्ट्यपूर्ण यात्रा आहे. यात्रेला सुमारे एक हजार  वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते.  पूर्वीच्या काळी कालकुंद्री गावाचा परिसर जंगलांनी वेढलेला होता. जंगलांमध्ये वाघ, अस्वल ,लांडगे आदी हिंस्त्र पशू पासून ग्रामस्थांना उपद्रव होत होता. वाघाने गावातील गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या आदी पाळीव पशुंना इजा करू नये यासाठी गावकुसाबाहेर वाघाची  मुर्ती तयार करून त्याची नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा केली जायची. तीच परंपरा शेकडो वर्षापासून आजतागायत सुरू आहे. परंपरेनुसार गावातील कोलकार ने लाकूड आणून  दिल्या नंतर त्यापासून सुतार  वाघाच्या दोन मुर्त्या तयार करतो. त्याची स्थापना या दिवसापुरती गावाबाहेर गणपती मंदिरासमोर केली जाते. या दिवशी गाव पाळक करून सायंकाळच्या वेळी अनेक सुवासीनी गोडा नैवेद्य दाखवून वाघोबाची पूजा करतात. यावर्षी गावातील सात पाटील घराण्यापैकी कलापा यल्लापा पाटील यांनी गार्‍हाणे घातले. कोलकार संजय कांबळे यांनी लाकूड आल्यानंतर मारुती दत्तू सुतार यांनी वाघाच्या प्रतिकृती बनवल्या सायंकाळी पूजन प्रसंगी हक्कदार उत्तम कोळी यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने हजर होते.



No comments:

Post a Comment