चंदगड / प्रतिनिधी
शिक्षण विभाग पंचायत समिती चंदगड मार्फत नुकतेच राईट टू रीड प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचे एक दिवशीय प्रशिक्षण बीआरसी हॉल चंदगड येथे नुकतेच संपन्न झाले. रीड टु मी सॉफ्टवेअर शाळांतील संगणकावर इंस्टॉल करण्याबाबतच्या या कार्यशाळेत गट साधन विषय तज्ञ सुनील पाटील, तज्ञ मार्गदर्शक विश्वास पाटील, प्रशांत मगदूम यांनी मार्गदर्शन केले. या सॉफ्टवेअरमुळे सर्व मुलांच्या बुध्दांकाचा विचार करुन अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केला असून मुलांच्या अध्ययन कौशल्यामध्ये वाढ होवून शिक्षण आखणी सुलभ होण्यास मदत होणार आहे. चंदगड तालुक्यामध्ये ज्या शाळांमध्ये संगणक सुविधा आहे व ज्या शाळांनी यापूर्वी लिंक भरून सॉफ्टवेअरची मागणी केली होती. अशा साठ शाळांमधील प्रतिनिधींना कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. हा सॉफ्टवेअर शाळेतील संगणक, लॅपटॉप किंवा तंत्रस्नेही शिक्षक अथवा मुख्याध्यापक यांच्या मोबाईलवर २५ जुलै अखेर इन्स्टॉल करणे बंधनकारक आहे. याकामी गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी नांदवडे केंद्र मुख्याध्यापक चंद्रशेखर जोशी, कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील आदींसह प्रशिक्षणार्थी शिक्षकांची उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक सुनील पाटील यांनी केले. आभार सदानंद पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment