कोवाड येथे वनसंवर्धन दिन व लोकमान्य टिळक जयंती उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2019

कोवाड येथे वनसंवर्धन दिन व लोकमान्य टिळक जयंती उत्साहात

केंद्रशाळा कोवाड येथे लो. टिळक प्रतिमेचे पूजन करताना शिक्षक व विद्यार्थी.
कोवाड / प्रतिनिधी
केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड ता.चंदगड येथे वन संवर्धन दिन तसेच लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रस्ताविक गणपती लोहार यांनी केले.
मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी झाडांचे उपयोग, वनांचे महत्व ,जंगलांना लागणाऱ्या वणव्यामुळे होणारे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान याबद्दल माहिती सांगितली. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी केसरी व मराठा वृत्तपत्रातून केलेले कार्य तसेच त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. यावेळी अध्यापक श्रीकांत आप्पाजी पाटील ,कविता पाटील, गणपती लोहार यांचेसह विद्यार्थी प्रांजल अशोक पाटील, पियुशा रामा यादव ,ऋतुजा परशराम भोगण, रणवीर व्यवहारे ,ओमकार परशराम पाटील, अथर्व नामदेव भोगण, रचना नरसु खोराटे आदी विद्यार्थ्यांनी वन संवर्धन दिन व टिळक यांचे बद्दल भाषणे केली. यानिमित्ताने शाळेत रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment