पाटणे फाटा येथे ४ ऑगस्टला अण्णाभाऊ साठे शताब्दी महोत्सवाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2019

पाटणे फाटा येथे ४ ऑगस्टला अण्णाभाऊ साठे शताब्दी महोत्सवाचे आयोजन


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
सत्यशोधक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शताब्दी जयंती महोत्सव कार्यक्रम डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया शाखा चंदगडच्या वतीने रविवार ता. ४ ऑगस्ट 2019 रोजी व्ही. के. चव्हाण-पाटील महाविद्यालय पाटणे फाटा येथे दुपारी १२ वाजता आयोजित केली असल्याची माहीती जिल्हा संपर्क प्रमुख संजय सकट यांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्धघाटन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. सुकुमार कांबळे याच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान आर. पी. कांबळे असतील. कार्यक्रमाला गोपाळराव पाटील, माजी मंत्री भरमुअण्णा पाटील, तालुका संघाचे अध्यक्ष व गोकुळचे सचालक राजेश पाटील, सभापती, उपसभापती, आजी माजी जि. प. व प.स. सदस्य, सर्व संघटनाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment