कोवाड बीट अंतर्गत शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2019

कोवाड बीट अंतर्गत शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात

 किणी येथील शिक्षक प्रशिक्षणात  मार्गदर्शन करताना आनंदा पाटील सोबत केंद्रप्रमुख निटूरकर व तज्ञ मार्गदर्शक.
कालकुंद्री / प्रतिनिधी
किणी ता. चंदगड येथील जयप्रकाश विद्यालय येथे कोवाड बीट अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम - समृद्धी पर्व कार्यक्रमांतर्गत शिक्षक सक्षमीकरण दोन दिवशीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कालकुंद्री केंद्राचे केंद्रप्रमुख वाय आर निटुरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्‍हणून जयप्रकाश विद्यालयाचे मुख्याध्यापक पी जे मोहनगेकर , कुदनुर चे केंद्रप्रमुख डीआय पाटील आदी उपस्थित होते. कार्यशाळेत कोवाड, कालकुंद्री, कुदनूर, मांडेदुर्ग, माणगाव या पाच केंद्रातील सुमारे ८४ शिक्षक उपस्थित होते. त्यांना तज्ञ मार्गदर्शक ज. ल. पाटील(वि मं कागणी), आनंदा पाटील(वि मं तेऊरवाडी), सागर पाटील (वि.मं.राजगोळी),सट्टूपा सु. पाटील(विमं तिरमाळ) यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता पहिली ते आठवी शिकवणाऱ्या  पन्नास टक्के शिक्षकांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जात असून दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण श्रीराम विद्यालय कोवाड येथे २५ व २६ जुलै रोजी होणार आहे अशी माहिती निटूरकर यांनी दिली. प्रशिक्षण प्रसंगी बीआरसी विषयतज्ञ महादेव नाईक तसेच भाऊ देसाई यांनी भेट देऊन कार्य शाळेबद्दल समाधान व्यक्त केले. याकामी गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment