कुदनूरचा कबड्डीपट्टू सौरभ आंबेवाडकर याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2019

कुदनूरचा कबड्डीपट्टू सौरभ आंबेवाडकर याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

सौरभ आंबेवाडकर
कालकुंद्री / प्रतिनिधी
कुदनुर (ता. चंदगड) येथील सौरभ गोपाळ आंबेवाडकर यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सौरभ हा लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. नुकत्याच गारगोटी येथे पार पडलेल्या स्टुडंट ओलिंपिक कबड्डी स्पर्धेत सौरभने अष्टपैलू कामगिरी करत महाराष्ट्र संघामध्ये आपली निवड पक्की केली आहे. हरिद्वार येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओलिंपिक स्पर्धेमध्ये त्याची महाराष्ट्र संघातून निवड झाली. आहे. सौरभला शाळेचे मुख्याध्यापक सी. बी. निर्मळकर, जयप्रकाश विद्यालय किणीचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक पी. जे. मोहनगेकर यांच्यासह पालक व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment