चंदगड / प्रतिनिधी
दरमहा तीन हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा अशी पेन्शनरांची मागणी आहे. 7 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर येथील विक्रम हायस्कूल मैदानावर सर्व पेन्शनरांनी जमुन सनदशीर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जाण्याचे नियोजन आहे. चंदगड तालुक्यातील पेन्शनरांची या मोर्चासाठी जायचे आहे. यासंदर्भात नियोजनाची बैठक
मंगळवार 30 जुलै 2019 रोजी दुपारी दोन वाजता हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखानाच्या साईट वरील गणपती मंदिर येथे बोलावण्यात आली आहे. पेन्शनरासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. भविष्य निर्वाह निधी खाते वेळकाढूपणा करत आहे. अशा प्रकारे सरकार व खाते पेन्शनरांचे प्रश्न सोडवत नाही. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी येत्या 7 ऑगस्ट 2019 रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील पेन्शनर भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जाऊन "आमचे प्रश्न कधी सुटणार"? असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारतील. सरकारच्या वृत्तीला कंटाळल्याने अशा प्रकारे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हलकर्णी येथे होणाऱ्या बैठकीला सर्व पेन्शनरांनी उपस्थित रहावे असे आवाहन कॉ. अतुल दिघे, कॉ. दत्तात्रय अत्याळकर, कॉ. अनंत कुलकर्णी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment