चंदगड / प्रतिनिधी
मानवी जीवनाला ध्यान ही पद्धत संजीवनी आहे. ध्यान धारणेतून व्यक्तीमत्व विकास घडतो. जीवनात एकूण आत्मद्दानाची गरज असून सहजयोग ही एक सोपी पध्दत आहे. असे प्रतिपादन हलकर्णी(ता.चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या "व्यक्तीमत्व विकास "या विषयावर मार्गदर्शन करताना रवींद्र गावकर यांनी व्यक्त केले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी.वाय.निंबाळकर होते.
प्रारंभी प्रास्ताविक प्रा.यु.एस.पाटील यांनी केले. पाहूण्यांचा परिश्चय डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केरुन दिला. यावेळी सर्व मान्यवरना प्राचार्य निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विनोद निगुडकर, वैशाली भुजबळ ईत्यादीनी विद्यार्थ्यांना सहजयोगाचे महत्त्व पटवून दिले. ध्यान धारकांंचा जीवनात नेहमीच उपयोग होत असतो "विद्यार्थ्यांनी नित्यनियमाने ध्यानधारणा करावी"असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य निंबाळकर यांनी सांगितले. आभार प्रा.अवधूत जाधव यांनी मानले. प्रा.व्ही.व्ही.पाटील, प्रा.एच के.गावडे. प्रा.एम.एस.तायडे, प्रा.एस एन.पाटील, डॉ. ए पी.गवळी. इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment