शिवाजीराव पाटील |
भारतीय जनता पार्टीतून आगामी 2019 ची चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणुक भारतीय जनता कामगार आघाडीचे नेते व भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ मुंबईचे अध्यक्ष शिवाजी शटुप्पा पाटील यांनी लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.
शिवाजी पाटील यांनी माथाडी कामगारांची संघटना बांधून 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपली माथाडी संघटना भाजपमध्ये विलीन केली. यावेळी संघटित कामगारांची संघटना बांधून भाजपा बेस्ट युनियन (मुंबई) व एअरपोर्ट कामगार युनियनची स्थापना केली. भारतीय जनता पार्टीच्या जेष्ठ नेत्यांच्या आदेशाप्रमाणे पक्ष वाढीसाठी त्यांनी वेळेवेळी प्रयत्न केले आहेत. त्यांनी गुजरात राज्यासह महाराष्ट्रातील सांगली व अन्य महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये पक्ष संघटना वाढीचे काम केले आहे. श्री. पाटील यांनी पक्षासाठी केलेल्या कामाचा विचार करुन त्यांना असंघटित कामगार सुरक्षा मंडळ (महाराष्ट्र शासन) व किराणा बाजार व दुकाने मंडळावरही सदस्य म्हणून निवड केली आहे. श्री. पाटील हे मुळचे चंदगड तालुक्यातील इनाम सावर्डे गावचे असल्याने त्यांची नाळ चंदगड तालुक्याशी जुळलेली आहे. त्यांनी चंदगड तालुक्यातील लोकांची कामे केली आहेत. त्यामुळे त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणुक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment