गडहिंग्लजचे उपसभापती विद्याधर गुरबे यांची काँग्रेसकडून चंदगड मतदारसंघासाठी एकमेव मुलाखत - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2019

गडहिंग्लजचे उपसभापती विद्याधर गुरबे यांची काँग्रेसकडून चंदगड मतदारसंघासाठी एकमेव मुलाखत

विद्याधर गुरबे
नेसरी / प्रतिनिधी 
गडहिंग्लज पंचायत समितीचे उपसभापती व सतेज उर्फ बंटी पाटील यांचे खंदे समर्थक विद्याधर गुरबे यांची काँग्रेसकडून आज कोल्हापूर येथे चंदगड मतदारसंघासाठी एकमेव मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी केलेल्या कामांची पुस्तिका सोनलजी पटेल याच्याकडे सुपूर्द केली. त्यामुळे चंदगड मतदारसंघातून श्री. गुरबे हे संभाव्य उमेदवारांच्या यादीत सामील झाले आहेत. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी मुलाखती घेत असताना अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या हालचालीवर त्यांची बारीक नजर असणार आहे.
आज काँग्रेस कमिटी कोल्हापुर येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे कोल्हापुरतील सर्व मतदार संघातील इछूक उमेदवारांच्या मुलाखत आयोजित केल्या होत्या. चंदगड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी साठी उपसभापती पंचायत समिती गडहिंग्लज विद्याधर गुरबे यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी चंदगड विधानसभा मतदार संघात केलेल्या कामाची पुस्तिका सोनलजी पटेल याच्याकडे सुपूर्द केली. यावेळी काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. कोल्हापुर निरीक्षक अभय छाजेड, आमदार आनंदराव पाटील, प्रदेश सचिव तौफीकभाई मुल्लाणी, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील व कोल्हापुर  जिल्हा अध्यक्ष प्रकाश आवाडे, कोल्हापुर शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, सचिन चव्हाण उपस्थित होते. चंदगड विधानसभा मतदार संघात व जिल्हात युवक काँग्रेस अध्यक्ष कालावधीत ते आज अखेर पक्षाच्या कामाची केलेली कामे यांची पुस्तिका श्री. गुरबे यांनी वरिष्ठांच्याकडे सुपूर्द केली.

No comments:

Post a Comment