![]() |
सुनिल काणेकर |
चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती सुनिल काणेकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निवडीचे पत्र दिले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शिफारशी वरुन सुनिल काणेकर यांची निवड करण्यात आली आहे. या पदावर पूर्वी माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर हे कार्यरत होते. संजय गांधी निराधार व आर्थिक दुर्बलासाठी लाभार्थ्यांचे लाभ मंजूर करण्याचे काम सरकारी पातळीवर करायवाचे आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते सुनिल काणेकर यांच्या निवडीने तालुक्यातील निराधारांना आधार मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment