चंदगड / प्रतिनिधी
शहरासह परिसरात आज दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. सकाळपासून पावसाच्या जोरदार सरीसरी कोसळत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील दोन ताम्रपर्णी व घटप्रभा या दोन नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पावसाचा जोर असाच राहिला तर उद्या सकाळपर्यंत पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज सकाली आठ वाजेपर्यंत झालेल्या चोविस तासात तालुक्यात सरासरी 29.83 मिमी तर आतापर्यंत 1230 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात रोपलावण अंतिम टप्यात आली असल्याने हा पाऊस त्यासाठी उपयुक्त ठरला आहे. तालुक्यातील सात पाटबंधारे तलाव पावसामुळे भरले असून उर्वरीत दहा प्रकल्पापैकी जंगमहट्टी, आंबेवाडी, किटवाड क्र. 2 व काजिर्णे हे तलावर नव्वद टक्के भरले आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास येत्या आठवड्या हे देखील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. काल दिवसभरात सर्वांधिक पाऊस 47 मिलीमीटर हेरे मंडलमध्ये तर सर्वात कमी 11 मिमी पाऊस कोवाड येथे झाले आहे.
No comments:
Post a Comment