चंदगड तालुक्यात पावसाच्या तडाख्याने साडेअकरा लाखांचे नुकसान, पावसाचा जोर कायम - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2019

चंदगड तालुक्यात पावसाच्या तडाख्याने साडेअकरा लाखांचे नुकसान, पावसाचा जोर कायम

नद्या वाहताहेत दुथडी भरुन, नुकसानग्रस्तांना भरपाईची प्रतिक्षा
अतिवृष्टीमुळे घराचे छप्पर पडून झालेले नुकसान.
संपत पाटील, चंदगड
चंदगड तालुका हा निसर्गसंपन्नतेने नटलेला आहे. त्यामुळे या तालुक्यात वार्षिक सरासरी तीन ते साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. अलिकडे पावसाचे प्रमाण सर्वांप्रमाणे कमी झाले असले तरीही यावर्षी जून महिन्यापासून आतापर्यंत मुसळधार पावसाच्या तडाख्याने घरांच्या भिंती पडून, घराचे छप्पर उडून, गोठयावर झाड पडून आतापर्यंत साडेअकरा लाखांचे नुकसान झाले आहे. तर काही नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव घर सोडून दुसरीकडे वास्तव्य केले आहे. तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्याच्या प्रमुख ताम्रपर्णी व घटप्रभा या दोन नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोविस तासात तालुक्यात सरासरी - 29.83 मिमी तर आतापर्यंत सरासरी - 1230 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
चंदगड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. 
मागील चार ते पाच वर्षापासून निसर्गातील बदलामुळे चंदगड तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात तालुक्याच्या पश्चिम भागात असलेला जांबरे प्रकल्प पहिल्याच पावसात भरला आहे. तालुक्यातील जांबरेसह जेलुगडे, कळसगादे, किटवाड क्र. 1, पाटणे, सुंडी व घटप्रभा प्रकल्प भरल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. जूनच्या अखेरपासून चंदगड तालुक्यात सुरवात झाली. उशिरा का असेना पण पावसाने दमदार सुरवात करत सर्वाचीच दाणादाण उडवली. गेले दोन-तीन दिवस सुरु असलेल्या पावसाच्या दुसऱ्या इनिंगमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शिवारातील रोपलावणीची कामे आटोपण्यात बळीराजा दंग आहे. सद्यस्थितीला मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पावसाचा जोर असाच राहिला तर तालुक्यात दुसऱ्यांदा पुरस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. सद्य स्थितीला सर्व मार्ग वाहतुकीला खुले आहेत. पावसाचा जोर वाढल्यास उद्यापर्यंत ताम्रपर्णी व घटप्रभा या नद्यावरील सकल भागातील कोनेवाडी, हल्लारवाडी, करंजगाव, गवसे, हिंडगाव हि पुले पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. 
जांबरे प्रकल्पाच्या सांडव्यातून होणारा पाण्याचा विसर्ग.
                                 तालुक्यातील अन्य प्रकल्पातील पाणीसाठा कंसात टक्केवारी......
जंगमहट्टी मध्यम प्रकल्प (89.57), लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये आंबेवाडी (96.75), दिंडलकोप (62.33), हेरे (87.223), करंजगाव (30.57), खडकओहोळ (40.53), किटवाड क्र. 2 (90.50), कुमरी (74.90), लकीकट्टे (46.44), निट्टूर क्र. 2 (9.66) व काजिर्णे (91.27).

                                       पावसाची आजची व आतापर्यंतची आकडेवारी
आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोविस तासात तालुक्यात सरासरी -16.33 मिमी तर आतापर्यंत सरासरी -1200.16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडलनिहाय पावसाची आजची आकडेवारी कंसात आतापर्यतचा पाऊस - चंदगड -44मिमी (1477), नागणवाडी -24मिमी(1107), माणगाव -31मिमी (496), कोवाड -11मिमी (456), तुर्केवाडी -22मिमी (1299), हेरे -47मिमी (2103).
              चंदगड तालुक्यात पावसामुळे आतापर्यंत नुकसान झालेल्यांची नावे व नुकसानीची आकडेवारी
1) मौजे पार्ले येथील श्री पुंडलिक डामा कांबळे यांच्या घराचे छप्पर उडून 2 लाखाचे नुकसान.
2) मौजे शिरगांव येथील श्री सुरेश रवळु कुंदेकर यांच्या गोठयावर झाड पडून अंदाजे 10000 चे नुकसान. 
3) मौजे तळगुळी येथील श्री दुडू कांबळे यांच्या घराची भिंत पडून अंदाजे 20000 चे नुकसान 4) मौजे कालकुंद्री येथील श्रीमती अनुसया तातोबा पाटील यांच्या घराची भिंत कोसळून अंदाजे 20000 रुपयाचे नुकसान.
5) मौजे करंजगाव येथील गौराप्पा लक्ष्मण दळवी यांच्या घराची भिंत कोसळून 10000 चे नुकसान. 
6) मौजे तुर्केवाडी येथील आदम महंमद शेख यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून 15000 नुकसान.
7) मौजे तुर्केवाडी येथील वैजू रवळु गावडे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून 5000 नुकसान.
8) मौजे अलबादेवी येथील शिवाजी राणबा धनवडे यांच्या कच्या घराची भिंत कोसळून 20000 चे नुकसान.
9) मौजे शेवाळे येथील पांडुरंग संतू गावडे यांच्या पक्क्या घराची भिंत कोसळून 15000 चे नुकसान.
10) मौजे हेरे येथील चंद्रकांत मालोजी कांबळे यांच्या घराची भीत कोसळून 50000 चे नुकसान.
11) मौजे हेरे येथील रामचंद्र हरिचंद्र शिरोडकर यांच्या घराची भिंत कोसळून 50000 नुकसान, मौजे पाटणे येथील हिटलर जुजे सालदान यांचे पूर्ण घरी पडून 200000 चे नुकसान, 
12) मौजे पाटणे येथील बाबू नारायण दळवी यांच्या घराची भिंत पडून 30000 चे नुकसान. 
13) मौजे जेलुगडे येथील शिवाजी नारायण गावडे यांच्या जनावराच्या गोठ्याची भिंत कोसळून 25000 नुकसान.
14) मौजे गौळवाडी येथील गुंडू विठोबा ओऊळकर व शिवाजी गुंडू ओऊळकर यांच्या घराची भिंत पडून 100000 चे नुकसान. तसेच सदर घराच्या बाकीच्या भिंतींना तडे गेल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कुटुंब शेजारी स्थलांतर केले आहे.
15) मौजे जंगमहटी येथील रामचंद्र जोतिबा मोरे यांच्या घराची भिंत कोसळून 50000 नुकसान झाले. 
16) मौजे गौळवाडी ता चंदगड येथील नारायण वैजू ओऊळकर यांच्या घराची भिंत पडून 25000 चे नुकसान. तसेच सदर घराच्या बाकीच्या भिंतींना तडे गेल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कुटुंब शेजारी स्थलांतर केले आहे. 
17) मौजे नागरदळे येथील महादेव रामू सुतार यांच्या घराची भिंत कोसळून 30000 चे नुकसान.
18) मौजे चिंचणे पैकी कमलवाडी येथील निळाप्पा यल्लाप्पा पाटील यांच्या घराची भिंत कोसळून 50000 चे नुकसान
19) मौजे तुडिये येथील अनंत मोनाप्पा मोहिते यांच्या गोठ्याची भिंत कोसळून 10000 नुकसान
20) मौजे हलकर्णी येथील रामू बाबू नाईक यांच्या घराची भिंत कोसळून 50000 चे नुकसान.
21) मौजे हलकर्णी येथील यल्लाप्पा लक्ष्मण नाईक यांच्या घराची भिंत कोसळून 50000 चे नुकसान.
22) मौजे देवरवाडी येथील श्रीमती यशोदा आणाप्पा कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून अंदाजे 12000/हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
23) मौजे बसर्गे येथील निवृत्ती तुकाराम बेनके यांचा जनावरांच्या गोठ्याची भिंत कोसळून अंदाजे 20 हजारांचे नुकसान. 
24) मौजे जंगमहट्टी येथील हरिभाऊ बाळू गावडे यांच्या गोठ्याची भिंत कोसळून 15000 चे नुकसान 
25) मौजे हलकर्णी येथील गोविंद धाकलू नाईक यांच्या घराची भिंत कोसळून 10000 चे नुकसान. 
26) जंगमहट्टी येथील हणमंत धोंडिबा शिंदे यांचे घराची भिंत पडून 10000 रु चे नुकसान. 
संपत पाटील, चंदगड
27) मौजे करंजगाव येथील रामू विठोबा गुरव यांच्या घराची भिंत कोसळून 10000 चे नुकसान. 
या सर्वांना शासनाच्या वतीने लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे. 

No comments:

Post a Comment