हजारो कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भरमूअण्णा पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2019

हजारो कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भरमूअण्णा पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हात उंचावून दाखविताना माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, सोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व इतर पदाधिकारी.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात आजही गटातटाचे राजकारण प्रभावी आहे. माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी याचा चंदगडच्या राजकारणात एक सक्रीय व विधानसभेच्या राजकारणाचे गणित ठरविणारा मजुबत गट आहे. या गटाचे प्रमुख माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेवून आज कोल्हापूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांदादा पाटील यांच्यासह भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. आण्णांच्या भाजप प्रवेशाने चंदगड मतदारसंघातील भाजपची ताकद वाढली असल्याचे प्रवेशावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात हा प्रवेश झाला. 

आण्णांच्या प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्षासह आमदार अमल महाडिक, रमेश रेडेकर, ॲड. हेमंत कोलेकर, आजरा कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, राहुल चिक्कोडी भाजपचे शहरअध्यक्ष, ग्रामीण भाजपचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, गोपाळराव पाटील, नामदेव पाटील, चंदगड पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर यांच्या उपस्थितीत आण्णांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

आण्णांच्या सोबत चिरंजीव गोकुळचे संचालक दिपकदादा पाटील, सून माजी जि. प. सदस्य ज्योतीताई पाटील, 

माजी सभापती शांताराम पाटील, माजी सभापती यशवंत सोनार, माजी पं. स. सदस्य शहाबुद्दीन नाईकवाडी, माजी पं. स. सदस्य निंगु गुरव, माजी पं. स. सदस्य हसीना नाईकवाडी, 

शामराव बेनके, चेअरमन शाहु कॅश्यु मोहन परब, ज्ञानदिप शिक्षण संस्था अध्यक्ष प्रताप सुर्ववंशी, सदानंद बल्लाळ, गुरुनाथ बल्लाळ, मुरलीधर बल्लाळ, माजी सभापती सारिका जाधव, माजी व्हा. चेअरमन तालुका संघ पुंडलिक कदम, 

माजी सभापती बाजार समिती गडहिंग्लज उदयकुमार देशपांडे, माजी सभापती बाजार समिती गडहिंग्लज तुकाराम बेनके, संचालक बाजार समिती गडहिंग्लज किरण कांबळे, 

चंदगडच्या माजी सरपंच सुजाता सातवणेकर, माजी जि. प. सदस्य शकुंतला देसाई, माजी पं. स. सदस्य दत्तु कांबळे, स्वरा बल्लाळ, अनिल शिवनगेकर, माजी उपसभापती चंदगड सुमन बेनके यांच्यासह तालुक्यातील अण्णां गटाचे दुध संस्था, सेवा संस्था व ग्रामपंचातीचे सरपंच, सदस्य यांनी प्रवेश केला. कोल्हापूर येथील केशवराव भोसले येथील हाल व बाल्कनीमध्ये लोक खचखच भरले होते. 


No comments:

Post a Comment