चंदगड / अनिल धुपदाळे
निवडणूक प्रचाराच्या काळात पडत असलेल्या धुवाँधार पावसामुळे उमेदवारांना प्रचार यंत्रणेला मोठा अडथळा निर्माण होत आहे. सतत सुरु असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे, हाताला आलेली पीकांचे नुकसान झाले आहे. महापुरामुळे भयभीत झालेला शेतकरी आता पडत असलेल्या पावसामुळे हाताश झाला आहे, तर विधानसभा निवडणुकीच्या काळात पडत असलेल्या पावसामुळे उमेदवारांना प्रचारासाठी खुपच त्रासदायक ठरू लागले आहे.
शेतकऱ्यांना तसेच निवडणूक लढवणा-या उमेदवारांना हा पावुस म्हणजे जणू परिक्षाच ठरत आहे, मागे झालेला महाभयंकर पावूस शेतकऱ्यांना भयभीत करून सोडणारा ठरला होता. तर उरलेल्या-सुरल्या आशा सद्या पडत असलेल्या पावसाने तर शेतकऱ्यांना हाताश करून सोडले आहे. तर सद्या पडत असलेल्या पावसने खासकरून विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडून उभे राहीलेल्याना त्रासदायक ठरत आहे. चंदगड विधानसभा मतदार संघाचा विचार केल्यास या मतदारसंघातील बहुतांश गावे दुर्गम ठिकाणी आहेत. प्रामुख्याने चंदगड तालुक्यातील भौगोलिक रचना पाहता प्रचाराच्या द्रुष्टीने फारच कठीण आहे.खेडो-पाड्यात, वाडी-वस्ती पर्यंत जाणे आवश्यक असते त्यासाठी कसरतीचाच प्रकार आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न करत प्रचार केला जातो. पण यावेळी परिस्थिती बदलली आहे कारण पावसाळ्यातील पावसाप्रमाणे सद्या पडत असलेला पावुस ऐण प्रचारात मोठा त्रासदायक ठरू लागला आहे. निरूत्साही वातावरण तसेच सतत पावसाची रिपझिप यामुळे लोक जाम वैतागून गेले आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघात संपूर्ण चंदगड तालुका तसेच गडहिंग्लज तालुक्यातील बराचसा भाग व आजरा तालुक्यातील काही मिळून चंदगड विधानसभा मतदार संघाची निर्मिती झाली आहे. त्यापैकी चंदगड व आजरा हे दोन तालुके पावसाचे तालुके म्हणून ओळखले जातात. त्यामानाने गडहिंग्लज तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असते मात्र सध्या पडत असलेल्या पावसाने तिन्ही तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. परिणामी प्रचार व मतदान काळात जशी उत्स्फूर्ता असते तसे चित्र यवेळी पाहायला मिळत नाही. चंदगड तालुक्यातील त्याच प्रमाणे आजरा तालुक्यातील दुर्गम भागात जाणे आणि आपल्या उमेदवार प्रचारासाठी कार्यकर्ते धडफड करत आहेत.हे खास वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment