![]() |
कोलिक (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातल्याचे निवेदन तहसिलदारांना देताना ग्रामस्थ. |
चंदगड / प्रतिनिधी
तालुक्याच्या दक्षिणेस वसलेल्या कोलीक (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी वारंंवार मागणीी करुनही शाासनाकडून मुलभुत सुविधा मिळत नसल्याने 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चंदगड विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे निवेदन तहसिलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि , ``कोलिक हे गाव तालुक्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असून तालुक्याचे शेवटचे टोक आहे. हे गाव स्वातंत्र्यानंतर आजही विविध योजनेपासून वंचित राहिले किंबहुना शासकीय स्तरावर गावाकडे दुर्लक्ष झालेले आहे. गावातील आरोग्य उपकेंद्र मंजूर असूनही निधीअभावी रखडले आहे. कोलिक-म्हांळुगे-भडूंरा पुल-जिर्ण झालेले असून अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे. कोलिक मधून महाविद्यालयीन शिक्षण जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत एस. टी. सेवा मिळावी. वन्य प्राण्यापासून जिवितास धोका असलेने संरक्षण कुंपन करावे व नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई बाजारभावाप्रमाणे मिळावी. ग्रामसेवकाने यांनी केलेल्या अपहार रक्कम ग्रामपंचायतीस मिळावी. पशुवैद्यकीय दवाखान्याची व्यवस्था व्हावी, सिंचन व्यवस्था नसल्यामुळे पाण्याअभावी शेती करणे शक्य होत नसल्यामुळे रोजगारासाठी यूवकांना बाहेरगावी किंवा शहरामध्ये रोजगारासाठी जावे लागत आहे. प्रधानमंत्री सडक योजनेतून केलेल्या मुख्य रस्त्याची डागडूजी करावी . आमदार ,खासदार किंवा जि. प. व पं. स. सदस्य मतदान करण्यापुरतीच आश्वासने देतात. निवडणूक झाल्यानंतर कोणीही कामाची दखल घेत नाहीत किवा गावाकडे फिरकत नाहीत. हा आजपर्यंत चा ग्रामस्थांचा अनूभव आहे. म्हणून गावातील सर्व लोकांनी मिळून विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सरपंच संभाजी गावडे, उपसरपंच अनिल गावडे, ज्ञानेश्वर गावडे, मनिषा गावडे, जयश्री देसाई, सत्यवती नाईक, अनंत गावडे, रघुनाथ गावडे, संतोष वांद्रे, गोविंद गावडे, दत्तू गावडे, लक्ष्मण गावडे, सागर गावडे, कमलाकर गावडे, मालू गावडे, आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment