कालकुंद्री दसरा क्रीडा महोत्सव कबड्डीत देव गल्ली संघ अजिंक्य - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2019

कालकुंद्री दसरा क्रीडा महोत्सव कबड्डीत देव गल्ली संघ अजिंक्य

श्रीकांत पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांक चषक स्वीकारताना देव गल्ली संघ सोबत मान्यवर.
कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या दसरा क्रीडा महोत्सव कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देव गल्ली संघाने सुभाष गल्ली संघावर मात केली. विजयी संघातील रवी पाटील, किरण पाटील, सोमनाथ पाटील, संदीप पाटील, संदीप कोले, सुधीर पाटील, प्रमोद पाटील, आदर्श पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला. स्पर्धेत तिसरा क्रमांक यादव गल्ली तर चौथा क्रमांक भिमक्रांती तरुण मंडळाने मिळवला. जाणता राजा युवक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत पंच म्हणून दिनकर पाटील, प्रमोद पाटील, भाऊ पाटील, तुलसीदास जोशी यांनी काम पाहिले. श्रीकांत पाटील, विजय पाटील, अर्जुन तेऊरवाडकर आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे समालोचन अमोल कोले. यांनी केले विजेत्या संघांना तसेच उत्कृष्ट चढाई, पकड, व अष्टपैलू खेळाडूंना रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात आले.


   

No comments:

Post a Comment