![]() |
कुदनूर येथे नवरात्र व्याख्यानमालेत बोलताना अखलाक मुजावर सोबत मान्यवर. |
देशात सर्व धर्माचे लोक राहतात. जीवनात सर्वांशी चांगले वर्तन ठेवून वागणे हाच खरा धर्म असल्याचे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते अखलाकभाई मुजावर (महागांव) यांनी केले. कुदनुर (ता. चंदगड) येथे नवरात्र उत्सव मंडळ आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. अध्यक्षस्थानी भीमराव बामणे होते.
स्वागत परसू कोकितकर व महालिंग मुक्कनावर यांनी केले. प्रास्ताविक आनंद कोरी यांनी केले. यावेळी पुढे बोलताना मुजावर म्हणाले स्त्री ही आदिशक्तीचे रुप आहे; तिचा सन्मान केला पाहिजे. तथापि दूरदर्शन वरील सुमार मालिका व चुकीच्या पद्धतीने होत असलेला मोबाईलचा वापर यामुळे संस्कृतीक हानी होत आहे. यातून होणाऱ्या नकारात्मक मानसिकतेमुळे आत्महत्या चिंताजनक प्रमाणात वाढल्या आहेत. चारित्र्य स्वच्छ ठेवून न्यूनगंड बाजूला ठेवल्यास धाडस आपोआप अंगी बाणते आणि जीवनातला प्रवास यशस्वी होतो. असा संदेश त्यांनी तरुण-तरुणींना दिला. यावेळी श्रीकांत वै. पाटील (कालकुंद्री) यांनी तंबाखू मुक्ती विषयी बोलताना तंबाखूचे होणारे दुष्परिणाम सांगून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय खवणेवाडकर, लक्ष्मण पाटील (दुंडगे), अक्षय महंत (महागांव) यांच्यासह ग्रामस्थ व महिलांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष शंकर कोरी यांनी केले.
No comments:
Post a Comment