बागिलगेला विद्युत खांब कधी मिळणार?, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2020

बागिलगेला विद्युत खांब कधी मिळणार?, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात


तेऊरवाडी/ प्रतिनिधी
बागीलगे ( ता. चंदगड ) येथील गणपत गल्लीमध्ये गेल्या दोन वर्षापासून विद्युत खांब उभा करण्यास विद्युत वितरण कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहे . यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थानी त्वरीत विद्युत खांब उभा न केल्यास विद्युत मंडळावर मोर्चा काढण्याचा इशारा  ग्रामस्थ एस .जी. पाटील यानी दिला आहे.
या परिसरात दोन वर्षापूर्वी झालेल्या जोरदार वादळाने झाड विद्युत खांबावर पडल्याने तो खांब वाकला होता . त्यानंतर विद्युत मंडळाकडून हा खांब काढून त्या जागी नवा खांब उभा करणे गरजेचे होते . पण तसे  न करता तो खांब फक्त काढून टाकला. याचा परिणाम या खांबावरून विद्युत जोडणी केलेल्या ग्रामस्थांची मोठी अडचण निर्माण झाली . जवळ खांबच नसल्याने घरासाठी विज जोडणी करताना शंभर ते दोनशे मिटरवरून करावी लागत असल्याने ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड तर बसतच आहे त्याबरोबरच लांबून विज जोडणी घ्यावी लागत असल्याने वारंवार बिघाड निर्माण होत आहे . यामूळे ग्रामस्थ वैतागले आहेत . वितरण कंपनीकडे रीतसर मागणी करुनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता तर त्वरित खांब न बदलल्यास आंदोलनाचा इशाराच देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment