शिकारीच्या संशयाने चौदा जणावर गुन्हा नोंद,१४ कुत्र्यांसह शिकारीचे साहित्य जप्त, वन विभागाची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2020

शिकारीच्या संशयाने चौदा जणावर गुन्हा नोंद,१४ कुत्र्यांसह शिकारीचे साहित्य जप्त, वन विभागाची कारवाई

शिकारीच्या संशयाने गुन्हा नोंद केलेल्या चौदा संशयितासह वनविभागाचे कर्मचारी. 
चंदगड / प्रतिनिधी
संक्राती सणानिमित्त शिकारीला आलेल्या १४ संशयीत आरोपींना चंदगड वनविभागाने गुन्हे नोंद केले आहेत.  त्यांच्याकडून १४ शिकारीची कुत्री, १ भाला, ६ कपळ बॅटऱ्या असे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती चंदगड वनविभागाचे वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे यांनी  दिली. या आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
अनिल रमेश कांबळे, मसणु विष्णु नाईक, अनिल मारुती आवडण, शिवाजी बसवंत कांबळे, सहदेव आप्पाजी पाटील, आप्पाजी गुंडू हासबे, तानाजी बाबाजी सदावर, विलास मारुती पेडणेकर, विजय वामन सुतार, विठ्ठल पांडुरंग सदावर, रामु बाबु नाईक, निवृत्ती लक्ष्मण नेसरकर, विठ्ठल सोमाण्णा कांबळे, नारायण आप्पाजी शिवनगेकर (सर्व रा. हलकर्णी, ता. चंदगड) अशी संशयितांची नावे आहेत. वनविभागातून मिळालेल्या माहितीनुसार - चंदगड तालुक्यात मकर संक्रातीनिमित्त काही गावांमध्ये शिकार होत असल्याची माहिती चंदगड  वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (१४ जानेवारी) रात्री चंदगड वनक्षेत्रपाल यांच्या नेतृत्वाखाली वन कर्मचारी व कोल्हापूर फिरते पथक यांनी चंदगड - जांबरे रस्त्यावर गस्त घालत होते. दरम्यान  देसाईवाडी येथे एक संशयीत वाहन थांबल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता वाहनामध्ये १४ संशयीत आरोपी आढळून आले. त्यांच्याकडे शिकारी कुत्री व भाला असे शिकारीचे साहित्यही आढळून आले. त्यावरुन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चंदगड वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे, फिरते पथक वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनपाल डी. जी. पाटील, बी. आर. निकम, ए. डी. वाजे, आर. के. देसाई, वनरक्षक एस. एस. पोवार, सागर पटकारे, वनमजुर नितीन नाईक, तुकाराम जाधव आदी कर्मचाऱ्यांनी हि कारवाई केली. 

No comments:

Post a Comment