चंदगड येथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार
चंदगड / प्रतिनिधी
राज्यात भाजपची सत्ता नसली तरीही राज्यात राबविल्या जाणाऱ्या ९० टक्के योजना केंद्र सरकारच्याच आहेत. केंद्रात भाजपचे सरकार भक्कम आहे. राज्यातही ते लवकर येईल. पराभवाने खचू नका. अधिक उर्मीने काम करा , मुलींच्या शिक्षणावर , गोरगरिबांच्या आरोग्यावर काम करा . अडचणीतील लोकांना मदत करा,त्यांच्या समस्या जाणून घ्या,एकत्र काम केल्यानेच आपली ताकत निर्माण होणार असून भरमुआण्णा व गोपाळराव पाटील एकत्र राहिले तर तिसरा येथे कुणी येऊ शकणार नाही असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले . चंदगड येथे आयोजित केलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते . अध्यक्षस्थानी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील होते . प्रास्ताविक सुरेश सातवणेकर यांनी करून विरोधकामूळे आपला पराभव झाला नाही तर आमच्यातील गद्दारामुळेच भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागल्याची खंत व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील पूढे म्हणाले , भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे जे धोरण राज्यात अवलंबले गेले तेच धोरण जिल्हा परिषदेपासून ते थेट चंदगड नगरपंचायतीपर्यंत पोहचले . एकवेळ काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आले तरी चालेल , त्यांच्याकडे अधिक महत्वाची खाती गेली तरी चालतील , पण भाजपचा द्वेष करण्याची वृत्ती बाळगलेले सरकार दीर्घकाळ राज्य करेल , असे वाटत नाही . चंदगड नगरपंचायतीत निवडून आलेल्या पाच नगरसेवकांनी विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी. समाजकार्य करायला नगरपंचायतीची सत्ता लागत नाही . सत्तेत असलेल्यांपेक्षा अधिक चांगले काम करून दाखवावे.
माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी चंदगड तालुका मागास नाही तर माणसांची प्रवृत्ती मागास असल्याचा आरोप करून गोरगरिब जनतेच्या प्रेमाचा आपण इनामदार असल्याचे कबूल केले .चंद्रकांतदादा चंदगडमधून लढले असते तर एक सक्षम प्रतिनिधी चंदगडला मिळाला असता असे मत मांडले . भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील यांनी आपापसातील गैरसमजाने नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागल्याचे कबूल करून यापुढे आपआपसातील मतभेद विसरून एकीने काम करू असा विश्वास व्यक्त केला .चंद्रकांतदादानी चंदगडमधून निवडणुक लढवली असती तर ७० हजार मताधिक्याने विजयी झाले असते असे सांगितले .चंदगड नगरपंचायतीत निवडून आलेले सचिन नेसरीकर दिलीप चंदगडकर,प्रमिला गावडे संजना कोकरेकर , नूरजहाँ नाईकवाडी,या नवनिर्वाचित नगरसेवकांसह,माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांचा वाढदिवसानिमित्त,भाजपा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मल्लिकार्जुन मुगेरी ,उपसभापतीपदी निवड झालेल्या मनिषा शिवणगेकर ,ग्रामोद्योग संघाचे प्रकाश सौदागर आदींचा यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी समृद्धी काणेकर ,मनिषा शिवनगेकर, गोविंद पाटील, नामदेव पाटील, तुकाराम फाटक,सूनिल काणेकर,सूधीर देशपांडे, अनिल शिवनगेकर, भावकू गूरव,अशोक पाटील,पं.स.सदस्य बबनराव देसाई, विठाबाई मूरकूटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment