तुर्केवाडीच्या अजित पाटीलची उत्तर प्रदेशच्या जस्ट कब्बड्डी लिग संघामध्ये निवड - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2020

तुर्केवाडीच्या अजित पाटीलची उत्तर प्रदेशच्या जस्ट कब्बड्डी लिग संघामध्ये निवड

उत्तर प्रदेशच्या जस्ट कब्बड्डीसाठी निवड झालेला तुर्केवाडी ( ता. चंदगड ) येथील शिवकृपा मंडळाचा खेळाडू अजित पाटील
तेऊरवाडी/ प्रतिनिधी
चंदगड तालूक्यातील खेळाडू कब्बड्डी स्पर्धामध्ये देशपातळीवर दबदबा निर्माण करत असल्याचे स्पष्ट होत आहे . तुर्केवाडी ( ता. चंदगड ) येथील अजित  नारायण पाटील या खेळाडूची उत्तर प्रदेशच्या जस्ट कब्बड्डी लिग संघामध्ये निवड झाल्याने तालूक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सध्या हुंदळेवाईवाडीच्या सिद्धार्थ व सुरज देसाई या दोन्ही बंधूनी कबड्डीमध्ये उंच भरारी घेतली आहे . शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तूर्केवाडीच्या अजित पाटीलचा कब्बड्डीचा प्रवासही प्रशंसनिय आहे . शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अजितला खेळाची प्रचंड आवड होती . शालेय जीवनात सर्वच खेळामध्ये हिरीरीने भाग घेणाऱ्या अजितचा खरा कब्बड्डी खेळ बहराला आला तो १२ वी झाल्यानंतर . अजितचे वडील नारायण पाटील कबड्डी स्पर्धा भरवाचे . यावेळी गावातीलच जय शिवकृपा कब्बड्डी संघाकडून अजितने खेळायला सुरवात केली .बघता बघता अजित संघाचा अष्टपैलू खेळाडू बनला . चंदगड , आजरा,गडहिंग्लज बरोबर कर्नाटकातील बेळगाव , खानापूर तालूक्यातील अनेक स्पर्धामध्ये प्रथम क्रमांकाचे विजय संपादन केले . घरची परिस्थिती अंत्यंत प्रतिकूल असूनही चंदगड च्या लाल मातीत जन्मलेल्या व खेळत असलेल्या या खेळाडूची हरियाना येथे निवड चाचणी झाली. हजारो युवकामधून अजितचा अष्टपैलू खेळ पाहून यूपी लिगचे मालक  सोहन  तुशिर यानी तीन वर्षासाठी संघाचा अष्ठ पैलू खेळाडू म्हणून निवडीचे पत्र दिले आहे. पुढील महिण्यात हरियाणा येथे सराव  होणार आहे तर एप्रिल महिण्यात या स्पर्धाना सुरवात होणार आहे. तुर्केवाडीसारच्या ग्रामीण भागातील खेळाडू उत्तर प्रदेशच्या संघातून खेळणार असल्याने चंदगड तालूक्यात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे .सध्या मात्र अजितच्या सरावासाठी आर्थिक गरज निर्माण झाली आहे. सेवाभावी संस्थानी अजितला सहकार्य केल्यास अजित निश्चितपणे तालूक्याचे नाव उज्वल करेल.

No comments:

Post a Comment