उदयोन्मुख साहित्यिक दशरथ माडभगत यांच्या सवंगडी पुस्तकाचे १८ रोजी प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2020

उदयोन्मुख साहित्यिक दशरथ माडभगत यांच्या सवंगडी पुस्तकाचे १८ रोजी प्रकाशन


कालकुंद्री / प्रतिनिधी
गवसे (आल्याचीवाडी) ता. आजरा येथील साहित्यिक दशरथ माडभगत यांच्या 'सवंगडी' या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार १८ जानेवारी 2020 रोजी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे दुपारी दोन वाजता होणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या हस्ते होणाऱ्या प्रकाशन सोहळा होणार आहे. लेखक व श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉम्रेड संपत देसाई, साहित्य अकादमी नवी दिल्ली चा बाल साहित्य पुरस्कार प्राप्त लेखक सलीम मुल्ला, आजरा पंचायत समिती सभापती उदयराज पवार, नगराध्यक्षा सौ ज्योत्स्ना चराटी. अशोकअण्णा चराटी, प्राचार्य अशोक सादळे, सुनील देसाई प्राचार्य व्यंकटराव हायस्कूल जुनियर कॉलेज, प्राचार्य विजय राजोपाध्ये आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास साहित्यप्रेमी, हितचिंतक व सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाशक त्रिभुवननाथ जोशी, अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर तसेच आयोजक क्लासिक कन्सेप्ट ग्रुप आदींनी केले आहे.



No comments:

Post a Comment