![]() |
पाटणे फाटा ते पारगड रस्त्याचे पॅचवर्कची तपासणी करताना अधिकारी. यावेळी उपस्थित आंदोलक. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा ते पारगड रस्त्याच्या पॅचवर्कचे काम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले होते. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या तपासणीचे आश्वासन बांधकाम विभागाने दिले होते. त्यानुसार आज सांगलीच्या अभियंता सौ. प्रमिला घोलकर यांच्या उपस्थितीत पाटणे फाटा ते पारगड रस्त्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. सहा नमुन्यापैकी तीन नमुने अधिकाऱ्यांकडे व तीन नमुने आंदोलनकांच्याकडे देण्यात आहे. यामध्ये दोषी आढळल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिले.
पाटणेफाटा ते पारगड या रस्त्याचे पॅचवर्कचे काम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले होते. पंधरा दिवसातच या रस्त्यावर पून्हा खड्ड्याचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील युवकांनी महिनाभरापूर्वी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच रस्ता उकरुन पोलखोल केली होती. त्यानंतर या रस्त्याचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले. त्यानुसार आज पाटणे फाटा ते पारगड या रस्त्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या नमुन्यापैकी तीन नमुने बांधकाम विभागाकडे तर उर्वरीत तीन नमुने आंदोलकांकडे तपासणीसाठी देण्यात आले आहेत. आंदोलक हे नमुने तपासणीसाठी शासकीय तंत्रनिकेतन आणि शिवाजी विद्यापीठाच्या टेक्नॉलॉजी विभागाकडे देणार आहेत. दिड महिना पाठपुरावा केल्यानंतर ही तपासणी नेमली होती. यावेळी सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता संजय सासने, शाखा अभियंता आय. ए. मुल्ला यांच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली. या तपासणी वेळी अनिल तळगुळकर, विश्वनाथ ओऊळकर, भारत गावडे, विजय आवडण, मोहन पाटील, देवाप्पा सदावर, सागर पाटील, गोपाळ निवगिरे, प्रशांत आपटेकर, अनिल पाटील यासह बहुसंख्य आंदोलक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment