ह्दयविकाराच्या झटक्याने कंपनीतील कामगाराचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2020

ह्दयविकाराच्या झटक्याने कंपनीतील कामगाराचा मृत्यू


चंदगड / प्रतिनिधी
ह्दयविकाराच्या झटक्याने पेपर मिलमध्ये काम करणाऱ्या चालक कामगाराचा मृत्यू झाला. मोहम्मद भोला याकुब शेरखान (वय-57, रा. उत्तर प्रदेश, सद्या रा. हलकर्णी एमआयडीसी) असे मयताचे नाव आहे. बुधवारी (ता. 15) रात्री दहा ते गुरुवारी (ता. 16) सकाळी आठच्या दरम्यान हि घटना घडली. महेश कांबळे यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली. 
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी - हलकर्णी (ता. चंदगड) एमआयडीसीतील रविकिरण पेपर कंपनीमध्ये मोहम्मद हा चालक म्हणून कामाला होता. तो चंदगडहून गोव्याला पेपर पुरवठा करणाऱ्या वाहनावर चालक होता. बुधवारी रात्री तो काम संपवून रविकिरण कंपनीमध्ये रात्री दहा वाजता झोपी गेला. सकाळी महेश कांबळे हा कामगार बघायला गेला असता तो त्याला मृत अवस्थेत आढळून आला. चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. नाईक श्री. मकानदार तपास करत आहेत. 



No comments:

Post a Comment