जि. प. व ओलम शुगरमार्फत कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबीर, दोनशे रुग्णांची तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2020

जि. प. व ओलम शुगरमार्फत कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबीर, दोनशे रुग्णांची तपासणी

ओलम-हेमरस वरील आरोग्य शिबिरात रुग्ण तपासणी करताना डॉ. चौगुले व आरोग्य विभागाचे पथक.
कालकुंद्री / प्रतिनिधी
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम अग्रो इंडिया प्रा. लि. व जी प. कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कारखाना कार्यस्थळावर ऊसतोड मजूर व कामगारांसाठी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि प सदस्य कल्लाप्पा भोगण होते.
शिबिराचे उद्घाटन ओलम-हेमरस कारखान्याचे युनिट हेड भरत कुंडल यांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे मुख्यशेती अधिकारी सुधीर पाटील यांनी केले. शिबिरात कोवाड प्रा आ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसन्नकुमार चौगुले व त्यांचे संपूर्ण पथक तसेच कोवाड येथील डॉ. अमोल पाटील यांनी शिबिरात कारखान्यातील कामगार व ऊसतोड मजूर अशा दोनशे रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. यावेळी बोलताना भरत कुंडल म्हणाले कारखाना हंगाम संपण्यापूर्वी ओलम साठी काम करणारे कामगार, ऊसतोड मजूर तसेच शेतकरी यांच्यासाठी सर्वांच्या जेवणाच्या सुविधेसह अशा प्रकारचा मोठा शिबिर कार्यक्रम आयोजित करणार आहोत. यावेळी पंस सदस्या नंदिनी पाटील, शेती अधिकारी नामदेव पाटील, कारखान्यातील सर्व विभागांचे प्रमुख कामगार व ऊसतोड मजुरांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment