तेऊरवाडी / प्रतिनिधी
तुडये (ता. चंदगड) येथे संभाजीराजे युवक मंडळाच्या वतीने १८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील श्री रामलिंग हायस्कूल व ज्यूनिअर येथे या स्पर्धा होतील. इयत्ता तीसरी ते सातवी असा प्राथमिक गट तर इयत्ता ८ वी ते १० या माध्यमिक गटासाठी या स्पर्धा होत आहेत . प्राथमिक गटासाठी रुपये २००० ते ५०० रुपये पर्यंत पाच बक्षिसे आहेत तर माध्यमिक गटासाठी रूपये २५०० ते रुपये ८०० पर्यंत अशी पाच बक्षिसे आहेत . तरी या स्पर्धांचा लाभ कर्नाटक व महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनिनी घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
No comments:
Post a Comment