सीमाकवी रवींद्र पाटील दै.जनमत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2020

सीमाकवी रवींद्र पाटील दै.जनमत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत

दै. जनमतच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार स्विकारताना सीमाकवी रविंद्र पाटील व इतर. 
शिनोळी / प्रतिनिधी
दै. जनमत परिवाराच्या वतीने या वर्षीपासून देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सीमाकवी रविंद्र पाटील यांना देण्यात आला. कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी संजय शिंदे , मुख्य संपादक महादेव नरुटे , पोलिस उपअधिक्षक शिवाजीराव जमदाडे , पुंडलिकराव जाधव , कार्यकारी संपादक सुरेश माडकर , उपसंपादक सुरेश राठोड , पंडीतराव बोंद्रे व शाईन शेख यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.  कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मुख्य संपादक महादेवन नरुटे होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कार्यकर्तृत्वान व्यक्तींचा गौरव केला जातो. रवींद्र पाटील मूळचे कुद्रेमानी (ता.जि. बेळगांव) येथील असून चंदगड तालुक्यातील राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बुद्रूक येथे  सहा. शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते एक उत्तम निवेदक , पत्रकार , समालोचक ,तंत्रस्नेही शिक्षक व कवी तसेच आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कर्नाटक राज्याचे राज्याध्यक्ष व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी  आहेत.  शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक व कला - क्रीडा क्षेत्रात हिरिरीने सहभाग घेतात. यांना कोजिम प्रेरणा पुरस्कार , आदर्श पत्रकार पुरस्कार , काव्य कला गौरव पुरस्कार व राजा शिवछत्रपती पारगड पुरस्कार इत्यादी पुरस्कारांने सन्मानीत करण्यात आले आहे. यावेळी पुरस्कार स्विकारतांना बेळगांव येथील सर्व आदर्श शिक्षक स्नेही रणजीत चौगुले , मोहन पाटील , मोहन अष्टेकर ,संजय गौंडाडकर व  बजरंगराजे पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment