![]() |
उमेश रामचंद्र कांबळे |
मुलग्याच्या लग्नाची हळद लागण्यापूर्वीच बापाचा मृत्यू झाला. हि हृदयद्रावक घटना नागरदळे (ता. चंदगड) येथे काल शनिवारी 18 जानेवारी 2020 रोजी घडली. उमेश रामचंद्र कांबळे (वय-५६) असे मयत बापाचे नाव आहे. उमेश यांच्या बाळकृष्ण या मुलाचे लग्न सोमवार २१ जानेवारी 2020 रोजी होणार होते. त्यासाठी सर्व नातेवाईक पाहुणे, मित्रमंडळी यांना लग्नाच्या आमत्रणांच्या पत्रिका हि वाटण्यात आल्या होत्या. घरी आनदाचे वातावरण होते. पण अचानक काल घरचा कर्ता असलेल्या नवरदेवाचे वडिल उमेश यांचा अचानक मृत्यू झाला. घरातील आनंदाच्या वातरणाला दु:खाची किनार लागली. उमेश यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, जावई असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment