![]() |
लोसेन सिध्दार्थ ब्रिगेंजा |
कळसगादे (ता. चंदगड) गावच्या हद्दीत स्वप्नवेल हॉटेलकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या कॅनॉल ब्रिजच्या खाली ओढ्यामध्ये लोसेन सिध्दार्थ ब्रिगेंजा (रा. गोवा) या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी दुपारी तीन वाजता हा मृतदेह सापडला. कळसगादेचे पोलिस पाटील सदानंद सुतार यांनी याबाबतची माहीती चंदगड पोलिसात दिली.
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी – स्वप्नवेल हॉटेलचे मालक श्री. कोतवाल यांनी कॅनॉल ब्रिजच्या खाली ओढ्यामध्ये एका इसम पडलेला असल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असता एक व्यक्ती जखमी होवून तेथेच मयत झाल्याचे पोलिसांना कळाले. त्याच्याजवळ असलेल्या मोबाईलवरुन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यावेळी त्याचे नाव लोसेन सिध्दार्थ ब्रिगेंजा असल्याचे समजले. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पोलिस नाईक श्री. सुतार तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment