चंदगड पोलिसांकडून जंगमहट्टी व ईनाम कोळींद्रे येथे गोवा बनावटीची दारु हस्तगत - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2020

चंदगड पोलिसांकडून जंगमहट्टी व ईनाम कोळींद्रे येथे गोवा बनावटीची दारु हस्तगत


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी व ईनाम कोळींद्रे येथे बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारुचा साठा व विक्री केली जात असल्याची माहीती चंदगड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी छापा टाकून जंगमहट्टी (ता. चंदगड) येथून निवृत्ती सुभाना पारसी (वय-75) हा वृध्दाला तर ईनाम कोळींद्रे येथे संजय मोहन तारळेकर (वय-३५) या दोघांना अटक केली. 11 व 12 मार्च 2020 रोजी पोलिसांनी हि कारवाई केली.
चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉस्टेबल रूबीना पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तुर्केवाडी जवळपास असलेल्या जंगमहट्टी येथील निवृत्ती सुभाना पारसी हा व्रुध्द गोवा बनावटीच्या दारुची विक्री करत असल्याचे माहीती पोलिसांना मिळाली. यावरुन पोलिसांनी छापा टाकत पारसी याला गोवा बनावटीच्या सुमारे ३३६० रुपये कींमतीच्या दारु साठ्यासह ताब्यात घेतले. ईनाम कोळींद्रे येथे संजय मोहन तारळेकर (वय-३५) हा नागवे रस्त्यावरुन दुचाकी (प्लॅटीना, क्र. एम. एच. ०९, बी. यु ७८९७) वरून गोवा बनावटीची विविध प्रकारच्या सुमारे २५८७२ रुपये कींमतीची दारू व मोटर सायकल आणि मोबाईल असे सर्व मिळून सुमारे ५६८७२ रुपयाच्या मुद्देमालासहीत संशयित  संजय तारळेकर याला ताब्यात घेऊन कारवाई केली. पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॉ. सुतार व कॉ. मकानदार अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment