आजीच्या स्मृतिदिनी 150 पुस्तकांचे वाटप, शिनोळी प्राथमिक शिक्षकाचा स्तुत्य उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2020

आजीच्या स्मृतिदिनी 150 पुस्तकांचे वाटप, शिनोळी प्राथमिक शिक्षकाचा स्तुत्य उपक्रम


चंदगड / प्रतिनिधी
आपल्या आजीने केलेल्या संस्काराचा वारसा भावी पीढीकडे देण्याच्या हेतूने शिनोळी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस, आदर्श शिक्षक प्रशांत पाटील यांनी 'श्यामची आई'  पुस्तकाच्या 150 प्रतीचे वाटप करून आपल्या आजीचा स्मृतिदिन साजरा केला. आज तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त तुडये केंद्रातील 11 शाळांना प्रत्येकी 5 अशी 55 पुस्तके, प्राथमिक शाळा सरोळी येथील सातवीच्या 21 गुणवंत विद्यार्थ्यांना व प्रज्ञाशोध परीक्षेतील 25 गुणवंत विद्यार्थी, शिनोळी व तडशिनहाळ शाळेला प्रत्येकी 5 अशी एकूण 150 पुस्तकांचे वाटप केले.
यापूर्वीही पाटील यांनी वृद्धाश्रमांना शालींचे वाटप, खेळाडूंना किटचे वाटप करून स्मृतिदिन साजरा केला होता. प्रशांत पाटील यांनी आजपर्यंत अनेक समाजप्रबोधनात्मक उपक्रम घेतले आहेत. शैक्षणिक, विज्ञान प्रदर्शनातून अंधश्रद्धा, लेक वाचवा, आपत्ती व्यवस्थापन या विषयावर समाजप्रबोधन केले आहे. त्यामुळेच तत्कालीन प्रांत कुणाल खेमणार यांनी देखील त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, केदारी रेडकर गुणवंत शिक्षक पुरस्कार, सांगाती पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्राचार्य यु. डी. पाटील,  मुख्याध्यापक लोहार यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी अध्यक्ष आनंद पाटील, बाबाजी कांबळे, मनोहर पाटील, सोमनाथ पाटील, संदीप नेवगैरे, सावंत सर, भोजन सर उपस्थित होते. उदय पाटील यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment