कोरज येथून एकजण बेपत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2020

कोरज येथून एकजण बेपत्ता


चंदगड / प्रतिनिधी
कोरज (ता. चंदगड) येथून रहाते घरातून गंगाराम दत्तु कांबळे (वय-34) हे रहात्या घरातून 8 ऑक्टोबर 2019 पासून बेपत्ता झाले आहेत. सौ. माया गंगाराम कांबळे यांनी दिलेल्या वर्दीवरुन गंगाराम हे बेपत्ता झाल्याची नोंद काल रात्री चंदगड पोलिसात झाली. 
गंगाराम कांबळे
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी – गंगाराम कांबळे हे 8 ऑक्टोबर 2019 रोजी राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले आहेत. ते अद्यापपर्यंत परत न आल्याने त्यांचा शोध घेवूनही ते अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांची आतापर्यंत वाट पाहून घरच्यांनी ते बेपत्ता असल्याची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे. घटनेची नोंद चंदगड पोलीसात झाली असून पोलिस नाईक श्री. मकानदार तपास करत आहेत. त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे – रंगाने सावळे, उंची 5 फूट 2 इंच, चेहरा गोल, नाक लांब, केस काळे बारीक, अंगात पांढरा शर्ट व काळी पॅन्ट, पायात चप्पल व मराठी बोलतात. 

No comments:

Post a Comment