कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून चंदगड तालुक्यातील कोदाळी, हेरे व पाटणे येथील यात्रा रद्दचा तहसीलमधील बैठकीत निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून चंदगड तालुक्यातील कोदाळी, हेरे व पाटणे येथील यात्रा रद्दचा तहसीलमधील बैठकीत निर्णय

कोरोनाबाबत कोणती खबरदारी घ्यावी. याबाबतचे फलक चंदगड नगरपंचायतीच्या वतीने चंदगड शहरात लावण्यात आले. यावेळी उपस्थित नगरसेवक सचिन नेसरीकर, श्री. देसाई व नगरपंचायतीचे कर्मचारी.
चंदगड / प्रतिनिधी
चीनमधून आलेल्या व जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने भारततही शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार 31 मार्चपर्यंत सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या यात्रा, उत्सव व घऱगुती समारंभावर बंदी आणणारा आदेश जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर आज चंदगड येथील तहसील कार्यालयात तहसीलदार विनोद रणवरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये तालुक्यातील कोदाळी येथील माऊली देवीची यात्रा, हेरे येथील माटेश्वर देवाची यात्रा व पाटणे येथील सिमग्यानिमित्त होणारा जागर या सार्वजनिक कार्यक्रम व यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिन्ही गावच्या ग्रामपंचायतींना याबाबत सुचना दिल्या असून या यात्रा रद्द झाल्या आहेत. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने नागरीकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येवू नये, अफवावर विश्वास ठेवू नये. 31 मार्चपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कोणताही कार्यक्रम न घेण्याचे आदेश तहसिलदार श्री. रणवरे यांनी चंदगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत.

                               चंदगड नगरपंचायतीकडून डीजीटल फलकातून जनजागृती
चंदगड नगरपंचायतीच्या वतीने आज दिवसभर कोरोना व्हायरस पसरु नये. यासाठी नागरीकांना आवाहन करण्यासाठी रिक्षामध्ये स्पिकर लावून जनजागृती करण्यात आली. नगरपंचायतीच्या वतीने गर्दीच्या ठिकाणी कोरोना व्हायरस संंबंधी कोणती काळजी घ्यावी. या बाबतचे डिजीटल फलकही चंदगड शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. 

No comments:

Post a Comment