चंदगड / प्रतिनिधी
शेवाळे (ता. चंदगड) येथील गावामध्ये गेल्या आठवडाभरात घरामध्ये बांधलेल्या चार म्हैशीचा मृत्यू झाल्या. संभाजी सोमाना गावडे व महादेव निंगोजी मळवीकर यांच्या दोन म्हैशी अशा एकूण चार दुभत्या म्हैशींचा मृत्यू झाल्याने या शेतकऱ्यांचे अंदाजे सुमारे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर अशोक गणपती वांद्रे, विठोबा रामु गावडे व विलास शंकर तुपारे यांच्या तीन दुभत्या म्हैशी आजारी असून त्याचीही परिस्थिती नाजूक असल्याचे समजते. त्यांच्यावर रोज उपचार सुरु आहेत. मृत्यू झालेल्या म्हैशीचे शवविच्छेदन गोकुळच्या डॉक्टरांच्याकडून करण्यात आले. मात्र त्याचा रिपोर्ट अद्याप मिळाला नसल्याने मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे निदान अद्याप झालेले नाही. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांच्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. आणखी म्हैशी आजारी पडण्याची शक्यता असल्याने तत्पुर्वी म्हैशीचा मृत्यू कशामुळे झाला. या कारणाचा शोध घेवून यापुढील म्हैशीचे मृत्यू टाळण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हैशी मयत झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment