चंदगड फाट्यावरील जुनाट झाडे तोडण्याची कृती समितीची सार्वजनिक बांधकामकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2020

चंदगड फाट्यावरील जुनाट झाडे तोडण्याची कृती समितीची सार्वजनिक बांधकामकडे मागणी

चंदगड फाट्यावरील जूनाट झाडे तोडण्याची मागणीचे निवेदन बांधकामचे उपअभियंता संजय सासणे यांनी देताना कृती समितीचे पदाधिकारी.
चंदगड / प्रतिनिधी
बेळगाव-वेंगुर्ले महामार्गावरील शिरगाव फाट्यानजीक रस्त्याच्या दुतर्फा असलेली जूनाट व वाळलेले झाडे तोडण्याची मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.
शिरगाव फाटा हा पंचक्रोशीतल रहदारीचा बस थांबा आहे. येथे मोठया प्रमाणात प्रवासी ऊभे राहतात. या ठीकाणी आंबा व जांभुळ जातीची मोठी धोकादायक झाडे वाळलेली आहेत. पावसाळयामध्ये जीव मुठीत घेऊन प्रवासी ऊभे असतात. त्यामुळे बांधकाम विभागाने ही झाडे  काढुन जीवीत व वित्त हनी टाळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बांधकामचे उपअभियंता संजय सासणे यांनी हे निवेदन स्विकारले. निवेदन देताना गणेश फाटक, अॅड. रवि रेडेकर,  शिवाजी गावडे, राजु निगुळे, परशराम मुळीक, नितेश खाटकी, विलास वाके, नामदेव अधिकारी, चंद्रकांत गावडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment