कोवाड महाविद्यालयात हिमोग्लोबिन तपासणी शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2020

कोवाड महाविद्यालयात हिमोग्लोबिन तपासणी शिबिर

विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करताना प्रयोगशाळा तंत्रज्ञ रजपूत सोबत प्राचार्य एस एम पाटील, प्रा. दळवी आदी.
कालकुंद्री (प्रतिनिधी)
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आजच्या धावत्या युगात स्त्रियांच्या आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक विभाग व सहेली मंच च्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्राचार्य डॉ एस. एम. पाटील यांच्या हस्ते झाले.
शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड चे प्रयोगशाळा तंत्रज्ञ नरेंद्र रजपूत व आरोग्य सेविका संजीवनी पाटील यांनी ७० विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी केली. रक्तातील हिमोग्लोबिन वाढीसाठी आहारामध्ये कोणत्या पोषक घटकांचा समावेश असावा याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. व्ही. के. दळवी, प्रा. विजयमाला साळोखे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment