कोरोना संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैदयकीय अधिकारी डॉ.बी.डी. सोमजाळ, सोबत प्राचार्य एस .जी. पाटील |
संपूर्ण जगाबरोबर महाराष्ट्रातही वेगाने पसरत असणाऱ्या कोरोना पासून दूर रहायचे असेल तर विद्यार्थी वर्गाने योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन अडकूर (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकारी डॉ .बी.डी. सोमजाळ यानी केले. श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर येथे सर्व विद्यार्थी वर्गासाठी आयोजित ' कोरोना ' या विषयावरील माहिती देताना डॉ़. सोमजाळ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस .जी. पाटील होते.
डॉ. सोमजाळ पुढे बोलताना म्हणाले, ``सध्या जगामध्ये सर्वत्र कोरोना विषाणूचा धूमाकूळ चालू आहे . यासंदर्भात ग्रामिण भागात मोठया अफवाना ऊत आला आहे. विद्यार्थी वर्गाने वृत्तपत्र ,टिव्ही च्या माध्यमातून शासन व आरोग्य विभागाकडून येणारी योग्य ती माहीती पालकांना द्यावी. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, सर्दी, खोखला अशी लक्षणे दिसत असल्यास वैदयकिय मदत द्यावी, हात साबणाने स्वच्छ धुवावेत, थंड पदार्थ खाणे टाळावेत, गरज वाटल्यास मास्कचा वापर करावा. याची माहिती पालकांना घ्यावी. कोणत्याही अफवाना बळी न पडता आरोग्यासंदर्भात काही त्रास झाला तर तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधन्याचे आवाहन यावेळी बोलताना डॉं . सोमजाळ यानी केले.
यावेळी प्राचार्य एस. जी. पाटील विद्यार्थी वर्गाने योग्य ती काळजी घेऊन कोरोना चे संकट परतावून लावण्यासाठी शाळा व आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी आरोग्य सेवक श्री. क्षिरसागर, व्ही. एन. सुर्यवंशी, एस. के. हरेर, जे. व्ही. कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य एस. जी. पाटील यांनी केले. सुत्रसंचालन आर. व्ही. देसाई यानी तर आभार बंकट हिशेबकर यांनी मानले.
फोटो -
No comments:
Post a Comment