अथर्व इंटरट्रेड (दौलत) प्रशासनामार्फत मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अर्थिक मदत - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2020

अथर्व इंटरट्रेड (दौलत) प्रशासनामार्फत मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अर्थिक मदत

अथर्व इंटरट्रेडकडून मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीचा धनादेश चेअरमन मानसिक खोराटे यांच्या हस्ते देण्यात आला.
चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व कारखान्यात नोव्हेंबर 2019 मध्ये हंगामात सुरवातीला झालेल्या अपघातामध्ये उत्पादन विभागातील  कर्मचारी विलास लक्ष्मण पाटील (रा. चिंचणे, ता. चंदगड)  हे मयत झाले होते. त्यामुळे मयताच्या वारसांना सामाजिक बांधिलकीतून अथर्वचे अध्यक्ष मानसिंगराव खोराटे यांनी सव्वा लाख रूपये आर्थिक मदत केली.
विलास पाटील यांच्या वारसांना अपघात झाल्यावेळी तातडीची मदत देणेत आली होती. त्यानंतर  कारखाना कर्मचारी यांनी पगारामधून काही रक्कम व अथर्व प्रशासनामार्फत काही रक्कम जमा करुन मयत कर्मचाऱ्याच्या वारसांना मदत देणेचे निश्चित केले होते. त्यानुसार कै. विलास लक्ष्मण पाटील यांच्या पत्नी श्रीमती. भारती विलास पाटील यांना  पंचाहत्तर हजार रूपये व त्यांच्या आई श्रीमती लक्ष्मीबाई लक्ष्मण पाटील यांना  पन्नास हजार मदत देण्यात आले. मदतीचे धनादेश अथर्व इंटरट्रेडचे अध्यक्ष मानसिंगराव खोराटे यांचे हस्ते  देण्यात आले. यावेळी श्री. खोराटे म्हणाले, ``कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या उतरविलेल्या आयुर्विम्याचा लाभही मयत कर्मचाऱ्यांना मिळवून देण्याबरोबरच  मयताचे पत्नीस व मुलांना पेन्शन मिळवून देणेबाबत देखील प्रशासन सहकार्य करणार  असलेचे सांगितले.`` यावेळी व्यंकटेश ज्योती, मनोहर होसूरकर, गुंडू पाटील यासह  कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment