हलकर्णी येथे शाळा कृती समितीची सहविचार सभा संपन्न
चंदगड / प्रतिनिधी
![]() |
हलकर्णी येथे शाळा कृती समितीच्या सहविचार सभेत बोलताना प्रा. टी. एम. नाईक व इतर मान्यवर.
|
उच्च माध्यमिक शाळांचे कायम विनाअनुदानित तत्व 2008 पासून सुरू झाले. विनाअनुदानित तुकडीवर हजारोंच्या संख्येने शिक्षक अल्पशा तुटपुंज्या पगारावर ज्ञानदानाचे काम करत आहेत. या शिक्षक बांधवांना सरकारच्या नियमाने नियमित पगार सुरू व्हावा. यासाठी संघटनेची स्थापना गरजेतून निर्माण झाली आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माझा जन्म झाल्याचे प्रा. टी. एम. नाईक यांनी सांगितले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील व कनिष्ठ महाविध्यालयात संघटनेची सहविचार सभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष प्रा. नंदकुमार पाटील होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. पी. वाय निंबाळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रा. टी. एम. नाईक यांचा संघटनेच्या योगदानाबद्दल सत्कार झाला.
प्रस्ताविकातून प्रा. सुबराव पावले यांनी सहविचार सभेचा हेतू आणि उद्देश स्पष्ट केला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रा. नंदकुमार पाटील म्हणाले, ``संघटनेच्या माध्यमातूनच संघर्ष करायचे बळ मिळते. समाजातून निस्वार्थीपणा आणि माणूसकीची संवेदना कुठेतरी हरवत चालली असताना नाईक यांच्यासारखी माणसे राजकारणात गेली पाहिजेत, तरच समाजाचा उत्कर्ष होईल. यावेळीं प्रा. पी. यु. दळवी म्हणाले, ``संघटनेचे रोपटे रुजवून त्याचा वटवृक्ष करण्यात नाईक यांचे मोठे योगदान आहे. यावेळी उपाध्यक्ष प्रा. उदय बोकड, प्रा. रवी पाटील, प्रा. अंकुश नौकुडकर, प्रा. विक्रम पाटील, प्रा. सौ. एस. डी. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रा. संजीव चिंचणगी, प्रा. सुरेश कांबळे, प्रा. विनायक बुरुड, प्रा. भरमु हरकारे, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. धामनेकर, प्रा. निलेश कुचेकर, प्रा. एन. के. जावीर, प्रा. सौ. उत्तुरे, सौ. सुभेदार यांनी शिक्षकांचा आवाज विधानपरिषदेत पोहचावा यासाठी नाईक निवडणुकिसाठी शुभेच्छा देऊन सहकार्य करण्याची ग्वाही दिली. प्रा. विनायक कांबळे यांनी सुत्रसंचालन केले. सचिव प्रा. शाहू गावडे यांनी आभार केले.
No comments:
Post a Comment