नांदवडे येथे पकडलेला अवैध मद्यसाठा. |
चंदगड / प्रतिनिधी
नांदवडे (ता. चंदगड) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून 2 लाख 31 हजार 600 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली. संतोष रामाण्णा गावडे (वय 25, रा. चव्हाट गल्ली, नांदवडे) यांच्यावर या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या माहीतीवरुन रविवारी चंदगड परिसरातील संशयित ठिकाणी अवैद्य मद्य विक्री ठिकाणांची तपासणी करण्यात आली. हि तपासणी करताना नांदवडे येथे गोवा बनावटीचे मद्य आणल्याची खात्रीशीर माहीती भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार अचानकपणे नांदवडे गावचे हद्दीत असलेल्या ताम्रपणी नदीच्या पलीकडे रामण्णा गावडे यांच्या शेतघरामध्ये पिंजाराखाली लपवून ठेवलेला विविध ब्रॅंडचा मद्यसाठा मिळाला. यामध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे गोल्डन एस ब्ल्यू व्हीस्की 180 व 750 मिलीच्या भरलेल्या बाटल्या असलेले 40 कागदी बॉक्स मिळून आले. उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान संदिप जानकर, सचिन काळे, सागर शिंदे, जय शिनगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
No comments:
Post a Comment