![]() |
प्रा. अशोक पाटील |
कोवाड (ता. चंदगड) येथील व्ही. पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व पत्रकार प्रा. अशोक तुकाराम पाटील यांना कोल्हापूरच्या स्टार ॲकॅडमीतर्फे देण्यात येणारा यंदाचा `स्टार आदर्श शिक्षक पुरस्कार` जाहीर झाला आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 29 मार्च 2020 रोजी कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होईल.
प्रा. पाटील गेल्या वीस वर्षापासून `अर्थशास्त्र` विषयातील सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सोळा वर्षे त्यांनी मुक्त विद्यापीठात वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून काम केले आहे. गेल्या दीड दशकापासून ते कोवाड येथून एका दैनिकासाठी पत्रकार म्हणून बातमीदाराची जबाबदारी सांभाळत आहेत. लेखणीच्या माध्यमातून त्याने अनेक प्रश्नांना वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामीकार रणजित देसाई सार्वजनिक वाचनालयाचे ते संचालक असून अभय पतसंस्थेचे उपाध्यक्ष आहेत. केंद्रीय प्राथमिक शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीवरही ते कार्यरत आहेत. दहा वर्षे तंटामुक्त सदस्य समिती सदस्य म्हणूनही काम केले आहे. शिक्षक व पत्रकारितेच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
No comments:
Post a Comment