राजीव गांधी पतसंस्थेस ५५.४३ लाखांचा नफा, १५ टक्के लाभांश, ३२ वी वार्षिक सभा खेळीमेळीत - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2026

राजीव गांधी पतसंस्थेस ५५.४३ लाखांचा नफा, १५ टक्के लाभांश, ३२ वी वार्षिक सभा खेळीमेळीत

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

       कुदनूर (ता. चंदगड) येथील राजीव गांधी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. सिद्धेश्वर हायस्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन पी. बी. पाटील होते. 

वार्षिक सभेत बोलताना चेअरमन पी. बी. पाटील सोबत संचालक व मान्यवर 

   कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक कै. बाळासाहेब कोकितकर यांच्या फोटो पूजनाने झाली. स्वागत विषय पत्रिका वाचन शाखाधिकारी बाबुराव पाटील यांनी केले. संचालक प्रा. सुखदेव शहापूरकर यांनी प्रास्ताविकात कर्जाचा व्याजदर कमी असूनही स्थापनेपासून डिव्हिडंड देणारी ही संस्था असल्याचे सांगून सभासदांनी सर्व व्यवहार समजून घ्यावे व क्रियाशील राहावे असे आवाहन केले. यावेळी संस्थेचे शाखाधिकारी शामराव महादेव मुतकेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करून आहेर म्हणून ग्रॅच्युइटी व सेवक सुरक्षा ठेवीचा चेक देण्यात आला. यावेळी बोलताना चेअरमन पाटील यांनी अहवाल सालात संस्थेला रुपये ५५,४३,६७२ इतका नफा झाला असून यातून सभासदांना १५ टक्के  जाहीर केला. तो गणेश चतुर्थी पूर्वी देणार असल्याचे सांगितले. सभासदांनी ठेवी ठेवाव्यात, कर्जे घेऊन नियमित परत फेड करावी असे आवाहन केले.

     यावेळी झालेल्या चर्चेत पुंडलिक कोकितकर, बाळू चौगुले, प्रकाश हेबाळकर, रुक्माणा गावडे, मारुती आंबेवाडकर, चंद्रकांत निर्मळकर आदींनी भाग घेतला. या प्रसंगी व्हा. चेअरमन अशोक गवंडी, मुख्य व राजगोळी खुर्द, कोवाड, हलकर्णी, यशवंतनगर शाखांचे संचालक, शाखा चेअरमन शिवाजी नौकुडकर, विष्णू बागिलगेकर, निंगाप्पा माने,  झिम्माना पाटील, सल्लागार व विजया कोकीतकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश कुंभार यांनी केले. कृष्णा मांडेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment