"कोरोना" जनजागृतीसाठी हिंडाल्कोमार्फत बॅनर व पोस्टरचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

17 March 2020

"कोरोना" जनजागृतीसाठी हिंडाल्कोमार्फत बॅनर व पोस्टरचे वाटप


चंदगड / प्रतिनिधी
हिंडाल्को इंडस्ट्रीज उद्योग समूहामार्फत कोरोना व्हायरस रोगा विषयी जनजागृती करण्यासाठी  सामाजिक जाणिवेतून बॅनर व पोस्टरचे वाटप केले.
जिल्हा आरोग्य खात्याला कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती करण्यासाठी सहकार्य करणार आहे. यासाठी हिंडाल्कोने बॅनर आणि पोस्टर्स तयार केले आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत हिंडाल्को कंपनी आता कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृतीसाठी जिल्हा आरोग्य खात्याला सहकार्य करणार आहे. यासाठी हिंडाल्कोने कोरोना विषाणू संदर्भात माहिती देणारे लक्षवेधी जनजागृती पोस्टर्स व बॅनर्स तयार केले आहेत. हिंडाल्कोचे सहाय्यक उपाध्यक्ष विश्वास शिंदे, सीएसआर ऑफिसर रवी बिसगुप्पी आणि एचआर ऑफिसर राकेश नाईक यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन बॅनर्स आणि पोस्टर्स जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत व्ही. मुन्याळ यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी हिंडाल्कोचे अन्य अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment