चंदगड येथे आमदार राजेश पाटील यानी घेतला "कोरोना" संदर्भात आढावा, तहसिल कार्यालयत बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

17 March 2020

चंदगड येथे आमदार राजेश पाटील यानी घेतला "कोरोना" संदर्भात आढावा, तहसिल कार्यालयत बैठक

चंदगड तहसिल कार्यालयात कोरोना संदर्भात माहीती घेताना आमदार राजेश पाटील, समोर तहसिलदार विनाोद रवणरे, नायब तहसिलदार डी. एम. नांगरे.
चंदगड / प्रतिनिधी
कोरोना व्हायरस रोगाच्या  पार्श्वभूमीवर चंदगड येथील तहसील कार्यालयात आमदार राजेश पाटील यांनी आढावा बैठक घेतली.व उपाय योजने संदर्भात सूचना केल्या.  
आमदार राजेश पाटील यांनी करोना व्हायरस या रोगा संदर्भात शासनाने केलेल्या उपाययोजना याबाबतची माहिती दिली.तहसीलदार रणवरे यांनी यावेळी चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात तीन डॉक्टरांचे पथक कायमस्वरूपी उपलब्ध केल्याचे सांगून प्रत्येक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना चोवीस तास उपस्थित राहणे संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी यांना सूचना केल्याचे सांगितले,परदेशातून येणाऱ्या बाहेरील युवकांची ची नोंद आपल्याकडे असून त्यांच्या येण्याकडे आपले लक्ष असल्याचे सांगितले, चंदगड येथील तहसिल कार्यालयात कोरोना संदर्भात माहिती देणे-घेणे संदर्भात कार्यालय सूरू केल्याचे सांगितले  यावेळी  आमदार पाटील यांनी पाटील यांनी गडिंग्लज येथील जिल्हा उपकेंद्राची क्षमता वाढवून ती दोनशे खाट येथील चंदगड येथील ग्रामीण रुग्णालय व हलकर्णी औद्योगिक वसाहतीमधील (पाटणे फाटा)नियोजित ट्रामा सेंटर हे पन्नास खाटांचे करण्यासंदर्भात उपाययोजना केल्याचे सांगितले,यावेळी त्यानी तालूक्यातील विविध खात्यातील रिक्त जागा संदर्भात माहिती घेतली.यावेळी नायब तहसिलदार डी एम नांगरे, तानाजी गडकरी,अभय देसाई, प्रविण वांटगी,विष्णू आढाव,शाम तरवाळ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment