![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठ. |
कोरोना व्हायरसने जगामध्ये थैमान घातले आहे. त्याचा भारत देशातही दिवसेनदिवस फैलाव वाढत आहे. हा वाढता फैलाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने चंदगड तालुक्यातील सर्व आठवडा 31 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सुचना संबंधित ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. ग्रामपंचायतीनीही बाजार बंदचा निर्णय घेतला आहे.
चंदगड तालुक्याच्या विविध भागात आठवडा बाजार भरतो. रविवारी नागणवाडी, सोमवारी कानुर, मंगळवारी माणगाव, नांदवडे व इब्राहिमपूर, बुधवारी अडकूर व तुर्केवाडी, गुरुवारी चंदगड व कोवाड शुक्रवारी पाटणे, शनिवारी हेरे येथे बाजार भरतो. बाजारामध्ये गर्दी असते. यासाठी खबरदारी म्हणून आठवडा बाजार बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे नागरीकांतूनही स्वागत होत असले तरी भाजीपाल्याविना नागरीकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे अनेकांनी मिळेल तेथून भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेवून ठेवला आहे.
कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी कोवाड चा गुरुवारी होणार आठवडा बाजार बंद राहणार
कोवाड / प्रतिनिधी
चीनच्या वुहान शहरातून संपूर्ण जगभर पसरलेल्या कोरोना या व्हायसरचा फ़ैलाव रोखण्यासाठी आणि लोक एकत्र येऊन कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी याआधीच जिल्ह्यात सर्वत्र होणाऱ्या जत्रा, यात्रा, विविध समारंभ यावर निर्बंध लावले आहेत. सदर कोरोना व्हायरसचा विषाणू हा संसर्गजन्य स्वरूपाचा असल्यामुळे सर्वत्र होणारे आठवडी बाजार हे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश हे त्या त्या तालुक्यातील प्रशासनाला पत्रकाद्वारे कळविले आहेत. त्या अनुषंगाने कोवाडला गुरुवारी होणारा आठवडा बाजार हा सर्व व्यापारी, ग्राहक यांनी बंद ठेवण्याचे आवाहन हे कोवाड ग्रामपंचायतीने केले आहे. कर्यात भागातील कोवाडसह किणी, नागरदळे, दोन्ही कडलगे, ढोलगरवाडी, निट्टूर, घुल्लेवाडी, म्हाळेवाडी, शिवणगे, दुडगे, चिंचणे, कामेवाडी, कागणी, होसुर, तेऊरवाडी, हडलगे अशा एकूण 30 ते 40 खेडे गावातील लोकांसाठी या ठिकाणी मोठा बाजार भरतो. त्यामुळे लोक हे मोठ्या प्रमाणात एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा आठवडा बाजार बंद ठेऊन सर्वांनी सहकार्य करावे असे ग्रामपंचायतीने सर्वाना आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment