कोवाड (ता. चंदगड) येथे रिमझिम पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे केवळ डांबरी असलेला रस्ता ओला झाला होता. |
चंदगड तालुक्यातील विविध गावामध्ये आज दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कालपासूनच उष्णतेमध्ये वाढ झाली होती. आज दिवसभरात चंदगड शहरासह फाटकवाडी, हिंडगाव, नागनवाडी, काजिर्णे, शिरगाव, सुळये परिसरात पाऊस झाला. त्यामुळे काल काही भागात रिमझिम पाऊस झाला होता. आज कोवाड (ता. चंदगड) येथील परिसरात आज दुपारी तीनच्या दरम्यान अचानक वळीव पावसाने हजेरी लावली. कालपासुनच वातावरण ढगाळ होते. अशा परिस्थितीत आज सायंकाळी पाच ते सहा या दरम्यान पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या.
अवेळी पडलेल्या या वळीव पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. कोवाड, तेऊरवाडी, कागणी, होसुर, किणी, नागरदळे, कडलगे, ढोलगरवाडी, मांडेदुर्ग, कांर्वे, सुंडी, करेकुंडी, महिपाळगड, शिनोळी, निट्टूर, घुल्लेवाडी,
म्हाळेवाडी, शिवणगे, मलतवाडी, लकीकट्टे, माणगाव, तांबुळवाडी, डुक्करवाडी, हलकर्णी, दुंडगे, चिंचणे, कामेवाडी आदी भागात आज पावसाने तब्बल दोन तास हजेरी लावली. त्यामुळे हवेमध्ये कमालीचा गारठा जाणवत आहे. ऊस शेतीसाठी पाऊस गरजेचा असला तरीही कर्यात भागातील अनेक शेतकऱ्यांच्या गवताच्या गंजी भिजल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
No comments:
Post a Comment